मे २४
From Wikipedia
मे २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४४ वा किंवा लीप वर्षात १४५ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | |
२९ | ३० | ३१ | |||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] बारावे शतक
- ११५३ - माल्कम चौथा स्कॉटलंडच्या राजेपदी.
[संपादन] तेरावे शतक
[संपादन] सतरावे शतक
- १६२६ - पीटर मिनुईतने मॅनहॅटन विकत घेतले.
- १६८९ - ईंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणविसावे शतक
- १८२२ - पिचिंचाची लढाई - पेरूमध्ये अँतोनियो होजे दि सुकरने क्विटो स्वतंत्र केले.
- १८३० - साराह हेलचे मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.
- १८४४ - सॅम्युएल मॉर्स याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.
- १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल झकॅरी टेलरने मॉँन्टेरे जिंकले.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेने अलेक्झांड्रिया, व्हर्जिनीया जिंकले.
- १८८३ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - दुसरे बोअर युद्ध - युनायटेड किंग्डमने ऑरेंज फ्री स्टेट बळकावले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - इटलीने ऑस्ट्रिया व हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४० - इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अटलांटिक समुद्रातील लढाईत जर्मनीच्या युद्धजहाज बिस्मार्कने युनायटेड किंग्डमची मानाची युद्धनौका एच.एम.एस. हूड बुडवली. १,४१५ खलाशी, सैनिक व अधिकारी मृत्युमुखी.
- १९५८ - वृत्तसंस्था युनायटेड प्रेस ईंटरनॅशनलची (यु.पी.आय.) स्थापना.
- १९६८ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.
- १९६८ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
- १९७६ - लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. ला कॉँकॉर्ड विमानाची सेवा सुरू.
- १९९१ - इस्रायेलने इथियोपियातील ज्यूंना इस्रायलला नेले.
- १९९३ - एरिट्रियाला इथियोपियापासून स्वातंत्र्य.
- १९९३ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ई.स.पू. १५ - ज्युलियस सीझर जर्मेनिकस, रोमन सेनापती
- १६८६ - गॅब्रियेल फॅरनहाइट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८१९ - व्हिक्टोरिया, ईंग्लंडची राणी.
- १८७० - यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी, हिंदू-मुस्लिम ऐक्यवादी बंगाली मुस्लिम कवी.
- १९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.
- १९४२ - अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११५३ - डेव्हिड पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १३५१ - अबु अल हसन अली, मोरोक्कोचा सुलतान.
- १५४३ - निकोलस कोपर्निकस, आद्य अंतराळतज्ञ.
- १९९५ - हॅरॉल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
- २००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- बर्म्युडा दिन - बर्म्युडा.
- राष्ट्र दिन - एरिट्रिया.
- बल्गेरियन शिक्षण व संस्कृती दिन - बल्गेरिया.
- स्लोव्हेकियन साहित्य दिन - बल्गेरिया.