कुरो, पोलंड
From Wikipedia
कुरो हे नैऋत्य पोलंडमधील एक छोटे गाव आहे. हे लुब्लिन व पुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.
या गावाची वस्ती २,८११ (२००५चा अंदाज) आहे. ई.स. १४३१ व ई.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. ई.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढुन घेण्यात आला. ई.स. १७९५च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व ई.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. ई.स. १९१८ पासून कुरो पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, ई.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथ बॉम्बफेक केली होती.