Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
'पाय' (π) अव्यय राशी - Wikipedia

'पाय' (π) अव्यय राशी

From Wikipedia

पाय (π) ही अव्यय राशी वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्यातील गुणोत्तर दर्शवते. या अव्यय राशीचे मूल्य अदमासे ३.१४१५९२६५४ इतके आहे. गणनाच्या (calculation) सोयीकरिता या राशीचे मूल्य हे जवळपास २२/७ किंवा ३५५/११३ असेही धरले जाते.

रेडियन या आंतरराष्ट्रीय गणना पद्धती अथवा मेट्रिक पद्धतीतील कोनाच्या एककाचा या अव्यय राशीशी जवळचा संबंध आहे. एका पूर्ण वर्तुळात (३६० अंश) २π रेडियन होतात. एक रेडियन म्हणजे, वर्तुळाच्या ज्या दोन त्रिज्यांमधील कंसाची लांबी ही त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या लांबीइतकी आहे, अशा दोन त्रिज्यांमधील कोन.


[संपादन] "पाय"संबंधित काही चित्तवेधक गोष्टी

पायची किंमत २५६/८१ (म्हाणजे दशांश अपूर्णांक पद्धतीत ३.१६०४९३८२७) असल्याचे "रिंड पॅपिरस" ह्या नावाने आता ओळखल्या जाणार्या सुमारे ४००० वर्षांपूर्वीच्या एका मिसरी (इजिप्शन) भूर्जपत्रावर नमूद आहे! त्या भूर्जपत्राचे एक स्पष्ट आणि सुंदर रंगीत चित्र खालच्या वेबसाइट्मधे आहे ते अगदी पहाण्यासारखे आहे.

http://www.mathsisgoodforyou.com/topicsPages/egyptianmaths/rhynd.htm


वेगवेगळ्या प्राचीन बाबिलोनी आणि मिसरी लिखाणांमधे पायची मोघम किंमत ३, ३-१/६ (तीन पूर्णांक एकषष्ठांश), ३-१/७, किंवा ३-१/८ अशी असल्याचे उल्लेखही आहेत. आताच्या इराक देशात प्राचीन काळी बाबिलोन शहर हे एक संस्कृतीचे माहेरघर होते.


२,२४० वर्षांपूर्वी सद्यःच्या ग्रीसमधल्या सीरक्यूजमधे रहाणार्या आर्कीमिडिस ह्या अतिबुद्धिमान गणितज्ञांनी पायची हवी तितकी अचूक किंमत काढायची बहुकोनी आकृतींवर आधारलेली एक अभिजात पद्धत शोधून काढली, आणि तीच पद्धत पुढे सुमारे १८०० वर्षे लोक वापरत असत.


गणितात "irrational" ("अतार्किक") ह्या [विशेषण|विशेषणाने]] आकड्यांचा एक विशिष्ट गट ओळखला जातो. पाय हा त्या गटात मोडतो. (त्या गटात प्रवेश करताना पायचा पाय उंबरठ्यावर अडकून मोडतो की काय? हे केवळ गंमतीखातरचे विधान. असो.) त्या गटातल्या इतर आकड्यांसारखी पायची "अतार्किकता" अशी की त्याची किंमत अचूकपणे ठरवण्याकरता ३.१४१५९ मधल्या शेवटच्या ९ च्या उजवीकडे कितीही आकडे कितीही सूक्ष्म मोजमापांनी शोधले तरी ते आकडे पुरेसे ठरणार नाहीत, आणि त्याच्या जोडीला त्या आकड्यांमधे कोणतीही साचेबंद पुनरावृत्ती कदापि असणार नाही! पायची "अतार्किकता" जोहॅन लॅंबर्ट ह्या बुद्धिमान (स्वयंशिक्षित) जर्मन गणितज्ञांनी १७६८ साली नक्की सिद्ध केली.


प्राचीन भारतात आर्यभट नावाचे निदान दोन गणितज्ञ होऊन गेले. त्यांपैकी ई.स. ४७६ ते ५५० ह्या काळात आयुष्य जगलेले पहिले आर्यभट बहुधा सद्यःच्या केरळ विभागात जन्मले होते आणि त्यांनी कधीतरी मोठेपणी बहुधा सद्यःच्या पाटणा शहरात --त्यांच्या वेळच्या कुसुमपूर नगरात-- वास्तव्य केले होते. पायची किंमत त्यांनी ३.१४१६ अशी नक्की मुक्रर केली होतीच, शिवाय पाय हा एक "अतार्किक" अंक असल्याचेही त्यांनी जाणले होते असे काही इतिहाससंशोधक म्हणतात!


पायच्या अधिकात अधिक अचूक किंमतीतले दशांश चिह्नाच्या उजवीकडचे १,२४१,१००,०००,००० इतके आकडे एका अतिप्रभावी संगणकाच्या साह्याने शोधण्याचा अचाट उपक्रम जपानमधल्या टोक्यो विद्यापीठातल्या डॉ. कनादा ह्यांनी त्यांच्या काही सहकार्यांसमवेत ई.स. २००२ साली केला. (ते सगळे आकडे ह्या लेखातल्या अक्षरांच्या आकारात छापण्याकरता नेहमीच्या आकाराची सुमारे ३८३,०००,००० पाने लागतील! डॉ. कनादांनी ते सगळे अंक अर्थात कागदांवर छापले नव्हते! पण ते अंक त्यांनी कोणत्या पद्धतीने ठरवले असतील आणि त्यांपैकी एकूण एक अंकांची अचूकता त्यांनी कशी ठरवली केली असेल ह्या दोन्ही बाबी कुतूहलाच्या खास आहेत.) कोणत्याही व्यासाच्या वर्तुळाचा १,२४१,१००,०००,००० दशांश अंकांपर्यंत अचूक परीघ जाणून घेण्याची जर कोणाला गरज भासली तर त्याला डॉ. कनादा मदत करू शकतील! जगातल्या सर्वात जास्त प्रभावी संगणकाच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्याच्या मुख्य हेतूने डॉ. कनादांनी तो उपक्रम केला होता. ह्या लेखाच्या निदान काही वाचकांना कुठल्यातरी वर्तुळाकृति गोष्टीचा व्यास मोजून तिचा परीघ निदान २७५ दशांश अंकांपर्यंत अचूक जाणून घेण्याची गरज नक्कीच असणार :), म्हणून त्यांच्याकरता पायच्या किंमतीतले पहिले २७५ दशांश अंक येथे दिले आहेत! :


3.141592653589793238462643383279502884197169399375105820974944592307816406286

20899862803482534211706798214808651328230664709384460955058223172535940812848

11174502841027019385211055596446229489549303819644288109756659334461284756482

3378678316527120190914564856692346034861045432


गणितज्ञानात सर्वात महत्त्वाचे असे पाच अचल अंक गणितज्ञ मानतात त्यात पाय हा एक अंक आहे. 0, 1,"e", आणि "i" ही उरलेल्या अंकांची चौकडी आहे. ("e" हा पायसारखाच एक महत्त्वाचा "अतार्किक" अंक आहे. त्याची मोघम किंमत आहे 2.718281828459045235306....; "i" हे चिह्न "imaginary" ["काल्पनिक"] ह्या विशेषणाने ओळखल्या जाणाऱ्या अंकांकरता वापरण्याची रूढी आहे. "i"ची किंमत -1 च्या वर्गमूळाइतकी असते.) "ऑइलरची एकता" ह्या नावाने गणितज्ञानात एक महत्त्वाचे समीकरण प्रसिद्ध आहे. त्या समीकरणात वरच्या नेमक्या पाच अंकांचा समावेश आहे आणि ते समीकरण आहेही कमालीचे सुटसुटीत! निसर्गातल्या एका मोठ्या आश्चर्याचे ते समीकरण असे आहे:


e^(i*pi) + 1 = 0.



लिओनार्ड ऑइलर आणि जोहॅन लॅंबर्ट एकमेकांचे आणि महाराष्ट्रातल्या अल्पायुषी माधवराव पेशव्यांचे समकालीन होते.

[संपादन] बाह्यदुवे

एक पाय नाचव रे (मनोगत)

Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com