लात्व्हिया
From Wikipedia
लात्व्हिया हा बाल्टिक देशांपैकी एक देश आहे.
एस्टोनिया व लिथुएनिया हे इतर दोन बाल्टिक देश आहत.
राजधानी : रिगा लोकसंख्या : २२,७४,७३५(जुलै २००६ च्या अंदाजानुसार) भाषा : लाटव्हियन(५८.२ %) , रशियन(३७.५%), लिथुआनियन व इतर. साक्षरता : ९९.८ %
दोन महायुध्दां दरम्यानच्या काळातील स्वातंत्र्य वगळता १९४० पासून सोव्हिएत संघाचा एक अविभाज्य भाग .१९९१ नंतर सोव्हिएत संघातून फूटून स्वतंत्र. स्वतंत्र झाल्यावर बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगिकार.२००४ मध्ये नाटो व युरोपिअन समूहाचा सदस्य.
रोजगार :
- शेती ४.००%
- उद्योग २५.०० %
- सेवा ६०.०० %
शेतकी उत्पादने : धान्य,साखर,बटाटा,भाज्या,गोमांस,दूध व अन्य प्राणिज उत्पादने. उद्योगधंदे :वाहने,रेल्वे वाह्तुकीची साधने,कृत्रिम धागे,शेतीची अवजारे,खतं,ग्राहकोपयोगी इलेक्ट्रोनिक उपकरणे,औषधे,प्रक्रिया केलेले अन्न,वस्त्र प्रावरणे.ऊर्जा व कच्च्या मालाकरीता आयातीवर अवलंबून . जर्मनी व पुर्वीच्या सोव्हिएत देशांशी मह्त्वाचे व्यापारी संबंध .