जुलै २८
From Wikipedia
जून – जुलै – ऑगस्ट | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ||||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | |
३१ | ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जुलै २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०९ वा किंवा लीप वर्षात २१० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७९४ - फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९१४ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९३० - आर.बी. बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणाऱ्या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
- १९४५ - होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४५ - अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
- १९५० - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९५६ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६३ - फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७६ - चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
- १९८० - फर्नान्डो बेलॉँडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८५ - ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९० - आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९५ - आल्बेर्तो फुजिमोरी दुसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००० - आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००१ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] जन्म
- १८९१ - रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०७ - अर्ल टपर, टपरवेरचा ईंग्लिश शोधक.
- १९२९ - जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- १९३१ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- १९५४ - ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - पॉल स्ट्रँग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ४५० - थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.
- १०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.
- १७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
- १८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
- १९३४ - लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - पेरू
जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० (जुलै महिना)