जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज
From Wikipedia
जावा ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज (संगणक भाषा) आहे. जावा ही 'सन मायक्रोसिस्टिमस्' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली.
जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेअर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेअर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे 'Handheld computing devices' श्रेणीतील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.
जावाचे मुख्य उद्दिष्ट्य तिच्या 'Write once, run everywhere' ह्या ब्रीदवाक्यातून ध्वनीत होते. 'Write once, run everywhere' चा अर्थ 'जावामध्ये एकदा तयार केलेले सॉफ्टवेअर, जावा असलेल्या दुसऱ्या कुठल्याही काँप्युटर सिस्टिमवर चालते' असा आहे.