एडवर्ड बॅलियोल
From Wikipedia
एडवर्ड बॅलियोल (ई.स. १२८३ - ई.स. १३६७) स्कॉटलंडचा राजा होता.
हा जॉन बॅलियोल व इसाबेला दि वॉरेनचा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याने ईंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याच्या साहाय्याने स्कॉटलंडचा तत्कालीन बालराजा डेव्हिड दुसऱ्याला पदच्युत केले व राज्य मिळवले.
त्याने ई.स. १३३२चे काही महिने, ई.स. १३३३-ई.स. १३३४ व ई.स. १३३५-ई.स. १३३६ या काळात स्कॉटलंडवर राज्य केले.