ई.स. १८३५
From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ३० - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- फेब्रुवारी २० - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
- मे ५ - युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
- डिसेंबर २९ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
- डिसेंबर १ - हान्स क्रिस्चियन ऍन्डरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
[संपादन] जन्म
- ऑगस्ट ४ - जॉन व्हेन, ईंग्लिश गणितज्ञ.
[संपादन] मृत्यू
- मार्च २ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- जुलै ६ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.