अल्गोरिदम (Algorithm)
From Wikipedia
[संपादन] अल्गोरिदम
अल्गोरिदम म्हणजे कार्य सूची. संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल. गणित आणि संगणक विज्ञान या विषयांत अल्गोरिदम म्हणजे क्रमवार कार्यसूची जी ईच्छित कार्य पूर्ण करण्यास उपयोगी पडते. यासाठी निश्चित सुरुवात आणि शेवट माहित असावा लागतो.
[संपादन] इतिहास
"अल्गोरिदम" हा शब्द ९ व्या शतकातील पर्शियन गणिती "अबू अब्दूल्लाह मुहम्मद बिन मुसा अल-ख्वारिझ्मि" यापासून आलेला आहे. "अल्गोरिझम" (Alogrism) म्हणजे हिंदू-अरेबिक अंक वापरुन गणित करण्याचे नियम. परंतु १८ व्या शतकात या शब्दाची व्याप्ती वाढून तो युरोपिअन-लॅटिन भाषांतराप्रमाणे अल्गोरिदम असा झाला आणि गणिताशिवाय इतर विषयातहि या शब्दाचा वापर वाढला.
पहिला अल्गोरिदम इ.स. १८४२ मध्ये संगणकासाठी ऍडा बायरोन यांच्याकडून बॅबेजच्या अनॅलिटिकल इंजिन साठी लिहिला गेला.