मुक्त सॉफ्टवेअर
From Wikipedia
[संपादन] 'मुक्त' सॉफ्टवेअर अर्थात 'फ्री सॉफ्टवेअर' (Free Software)
'फ्री सॉफ्टवेअर' मधील 'फ्री'चा अर्थ 'फुकट' असा नसून, 'मुक्त' असा आहे. एखादे सॉफ्टवेअर फ्री सॉफ्टवेअर असणे हे त्या सॉफ्टवेअरबाबत लोकांना देण्यात आलेल्या काही मूलभूत हक्कांवर अवलंबून आहे. फ्री सॉफ्टवेअर ही संकल्पना सॉफ्टवेअर जगतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेअरची अधिकृत वेबसाईट पहा : http://www.fsf.org/
फ्री सॉफ्टवेअरची व्याख्या (अधिकृत वेबसाईटनुसार) पुढीलप्रमाणे आहे :
एखादे सॉफ्टवेअर फ्री सॉफ्टवेअर म्हणवण्यासाठी, पुढील बाबींमध्ये सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांना मुक्तता दिली असली पाहिजे. :
- कोणत्याही उद्दीष्टासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम 'रन' करणे, म्हणजे वापरणे ह्यास मुक्त परवानगी (मुक्ततेची मूलभूत - शून्य - पातळी)
- सॉफ्टवेअरचा, त्याच्या अंर्तगत रचनेचा अभ्यास करणे आणि आपल्या गरजेनुसार त्यात बदल करणे ह्यास परवानगी. (मुक्तता पातळी एक) - ह्यासाठी सॉफ्टवेअरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
- सॉफ्टवेअरच्या कॉपी इतरांस देण्यास मुक्त परवानगी. (मुक्तता पातळी दोन )
- सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणे व त्या लोकांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध करण्यास मुक्त परवानगी - ह्यासाठी सॉफ्टवेअरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे. (मुक्तता पातळी तीन)