ऑगस्ट ५
From Wikipedia
विशेष लेख |
---|
हा लेख मराठी विकिपिडीयावरील ५,०००वा लेख आहे. |
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | |
२८ | २९ | ३० | ३१ | ||||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१७ वा किंवा लीप वर्षात २१८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] बारावे शतक
[संपादन] चौदावे शतक
- १३०५ - स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६० - कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
- १८८२ - जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
[संपादन] विसावे शतक
- १९०१ - पीटर ओ'कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
- १९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - पोलिश क्रांतीकाऱ्यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
- १९४९ - इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
- १९६० - बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६२ - मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
- १९६२ - दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी ई.स. १९९०मध्ये सुटका.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
- १९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
- १९९५ - क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट महिना