From Wikipedia
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
- जानेवारी १७ - अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावरपोचला.
- फेब्रुवारी १४ - ऍरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.
- फेब्रुवारी १४ - ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.
- मार्च १ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
- मार्च ७ - रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.
- एप्रिल १४ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
- एप्रिल १८ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०६ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
- मे ४ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले.
- जून ६ - अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- जून १९ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
- जुलै १३ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- जुलै १९ - अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
- मे ३० - विल्बर राइट, विमानाच्या संशोधक राइट बंधूंपैकी एक.
ई.स. १९१० - ई.स. १९११ - ई.स. १९१२ - ई.स. १९१३ - ई.स. १९१४