Ebooks, Audobooks and Classical Music from Liber Liber
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z





Web - Amazon

We provide Linux to the World


We support WINRAR [What is this] - [Download .exe file(s) for Windows]

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
SITEMAP
Audiobooks by Valerio Di Stefano: Single Download - Complete Download [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Alphabetical Download  [TAR] [WIM] [ZIP] [RAR] - Download Instructions

Make a donation: IBAN: IT36M0708677020000000008016 - BIC/SWIFT:  ICRAITRRU60 - VALERIO DI STEFANO or
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
आयुर्वेद - Wikipedia

आयुर्वेद

From Wikipedia

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधीविग्रह जीवन (आयुः) + जाण किंवा ज्ञान (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो.

वनौषधी
Enlarge
वनौषधी

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत (सुमारे इसविसनपूर्व १२००) आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजल्या जातो. तथापि विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरानुसार आद्य वैद्य मानले जातात.

[संपादन] परंपरा आणि ग्रंथसंपदा

आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा (Schools of Thought) आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ याच परंपरांचा सारांश आहे आणि म्हणून हे ग्रंथ कोणी एका लेखकाने लिहिलेले नाहीत.

तिसरी परंपरा कश्यपांची आहे. आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून (सुमारे इसविसनपूर्व ५५६) ते सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत (सुमारे इसविसन ६००) या परंपरांचे कार्य चालत होते. पण तीन शाखांचे औपचारीक सिद्धांत आणि युक्त्या मूळ बौद्ध साहित्यात दिसून येतात. चरक आणि सुश्रुत संहितांचे बऱ्याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही परंपरा आहे, जिची सुरूवात सुश्रुताने केली असे मानतात.

इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणाऱ्या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदीक साहित्यांचे संश्लेषण केले ज्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळाधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला. यातील ७९ प्रकरणांमध्ये विविध विकार, त्यांची लक्षणे, कारणे आणि क्लिष्टता याबद्दल चर्चा केली आहे.

आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती, कंदमुळे यांच्यापासुन तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनीक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जावू लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बऱ्याच रासायनीक औषधांचा अभ्यास केला. विंचू, साप, कोळी इ. प्राण्यांच्या विषांचाही औषध म्हणुन वापर केला जातो. विषौषधाचा अभ्यास करणारी अगदतंत्र ही आयुर्वेदाची एक शाखा आहे.

[संपादन] मार्गदर्शक आणि मूळ तत्वे

[संपादन] पंचमहाभूते

प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे ज्यात सर्व भौतिकजग पाच मूळ तत्वांपासुन तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळतत्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.

[संपादन] गुण

गुण विरूद्ध गुण
गुरू (जड) लघु (हलका)
मंद (हळूहळू) तीक्ष्ण (तीव्र)
हिम, शीत (थंड) उष्ण (गरम)
स्निग्ध (तेलकट, ओशट) रूक्ष (कोरडा)
श्लक्ष्ण (गुळगुळीत) खर (खरखरीत)
सांद्र (घन, दाट) द्रव (पातळ)
मृदू (मऊ, कोमल) कठिण (बळकट, दृढ)
स्थिर (टिकाऊ) चल, सर (गतिमान)
सूक्ष्म (अतिशय बारीक) स्थूल (मोठा)
विशद (स्वच्छ) पिच्चिल (बुळबुळीत)

[संपादन] दोष

सर्व शारिरीक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रीत केल्या जातात

[संपादन] वात दोष

वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छवास, मनातील विचार इत्यादि गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष रोगाचे पहिले कारण असतो. वाताला वायू असेही म्हणतात.

[संपादन] कफ दोष

कफ आपतत्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकार शक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक(lubricant), जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रीत करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थुलता, सुस्ती आणि प्रत्युर्जता ((ऍलर्जि) allergy) इत्यादि त्रास होतात.

[संपादन] पित्त दोष

पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्न पचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.


[संपादन] निदानपद्धती

[संपादन] नाडीपरिक्षा

[संपादन] उपचार पद्धती

[संपादन] पंचकर्मे

[संपादन] वमन

[संपादन] विरेचन

[संपादन] बस्ति

[संपादन] नस्य

[संपादन] रक्तमोक्षण

[संपादन] औषध पद्धती

[संपादन] आसव

[संपादन] काढा

[संपादन] चूर्ण

[संपादन] तैल

[संपादन] घृत

[संपादन] आधुनिक आयुर्वेद

[संपादन] ग्रंथादि संदर्भ

  • Ayurveda Encyclopedia, Swami Sadashiva Tirtha, D.Sc., Ayurveda Holistic Center Press, Bayville, New York'
  • Ayurveda: Nature's Medicine, Dr. David Frawley and Dr. Subhash Ranade, Lotus Press, Twin Lakes, Wisconsin


[संपादन] बाह्य दुवे

हिंदू धर्म
श्रुति: वेद · उपनिषद्‌ · श्रुत
स्मृति: इतिहास (रामायण, महाभारत, श्रीमद्‌भागवत गीता) · पुराण · सूत्र · आगम (तंत्र, यंत्र) · वेदान्त
विचार अवतार · आत्मा · ब्राह्मण · कोसस · धर्म · कर्म · मोक्ष · माया · इष्ट-देव · मूर्ति · पुनर्जन्म · संसार · तत्त्व · त्रिमूर्ति · कतुर्थ;· गुरु
दर्शन: मान्यता · प्राचीन हिंदू धर्म · सांख्य · न्याय · वैशेषिक · योग · मीमांसा · वेदान्त · तंत्र · भक्ति
परंपरा: ज्योतिष · आयुर्वेद · आरती · भजन · दर्शन · दीक्षा · मंत्र · पूजा · सत्संग · स्तोत्र · विवाह · यज्ञ
गुरु: शंकर · रामानुज · मध्वाचार्य · रामकृष्ण · शारदा देवी · विवेकानंद · नारायण गुरु · ऑरोबिन्दो · रमण महर्षि · शिवानंद · चिन्‍मयानंद · शुब्रमुनियस्वामी · स्वामीनारायण · प्रभुपद · लोकेनाथ
विभाजन: वैष्णव · शैव · शक्ति · स्मृति · हिंदू पुनरुत्थान
देवता: हिंदू देवता नाम · हिंदू कथा
युग: सत्ययुग · त्रेतायुग · द्वापरयुग · कलियुग
वर्ण: ब्राह्मण · क्षत्रिय · वैश्य · शूद्र · दलित · वर्णाश्रम धर्म
Our "Network":

Project Gutenberg
https://gutenberg.classicistranieri.com

Encyclopaedia Britannica 1911
https://encyclopaediabritannica.classicistranieri.com

Librivox Audiobooks
https://librivox.classicistranieri.com

Linux Distributions
https://old.classicistranieri.com

Magnatune (MP3 Music)
https://magnatune.classicistranieri.com

Static Wikipedia (June 2008)
https://wikipedia.classicistranieri.com

Static Wikipedia (March 2008)
https://wikipedia2007.classicistranieri.com/mar2008/

Static Wikipedia (2007)
https://wikipedia2007.classicistranieri.com

Static Wikipedia (2006)
https://wikipedia2006.classicistranieri.com

Liber Liber
https://liberliber.classicistranieri.com

ZIM Files for Kiwix
https://zim.classicistranieri.com


Other Websites:

Bach - Goldberg Variations
https://www.goldbergvariations.org

Lazarillo de Tormes
https://www.lazarillodetormes.org

Madame Bovary
https://www.madamebovary.org

Il Fu Mattia Pascal
https://www.mattiapascal.it

The Voice in the Desert
https://www.thevoiceinthedesert.org

Confessione d'un amore fascista
https://www.amorefascista.it

Malinverno
https://www.malinverno.org

Debito formativo
https://www.debitoformativo.it

Adina Spire
https://www.adinaspire.com