नांदेड शहर
From Wikipedia
नांदेड हे महाराष्ट्रातील जिल्ह्याचे शहर आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे.
{{{नाव}}} | |
---|---|
जिल्हा | नांदेड |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | () |
दूरध्वनी कोड | |
पोस्टल कोड | |
आर.टी.ओ कोड | MH- |
निर्वाचित प्रमुख | (महापौर) |
प्रशासकीय प्रमुख | (महानगरपालिका आयुक्त) |
अनुक्रमणिका |
[संपादन] भौगोलिक स्थान
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळ हा जिल्हा येतो. नांदेड महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. लातूर, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि निजामाबाद हा आंध्रप्रदेशातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
[संपादन] कसे पोहोचायचे
नांदेड हे भारतीय रेल्वेच्या दक्षीण मध्य विभागात येते आणि मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडसाठी थेट सेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते जी दिल्ली, आग्रा, औरंगाबाद् या मोठ्या शहरांशी जोडते. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.
[संपादन] ऐतिहासिक स्थान
नांदेड येथे शिख गुरू गोविंदसिंग यांची समाधी आहे. तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे आहे. त्यामुळे शिख धर्मियांसाठी या ठिकाणाचे अपार महत्व आहे. हैद्राबाद मुक्ति संग्रामात नांदेड येथे भूमिगत आणि प्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणात चळवळ चालविण्यात आली होती.
[संपादन] सांस्कृतीक स्थान
[संपादन] भाषा
नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी आहे. आदिवासीक्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते.तेलगु,व उर्दुचा उपयोगही केला जातो.
[संपादन] परंपरा
माळेगावची जत्रा , हिंदु व शिख समुदायाचा दसरा हे वार्षीक सोहळे अत्यंत छान असतात.येथे गणेश उत्सवसुद्धा उत्साहाने साजरा केला जातो.
[संपादन] वृत्तपत्रे
नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृतपत्रे -
- दैनिक प्रजावाणी
- दैनिक गोदातीर
- दैनिक लोकपत्र
- दैनिक देशोन्न्ती
- दैनिक भुमीपुत्र
[संपादन] शैक्षणिक स्थान
नांदेड हे शैक्षणीकदृष्ठा महत्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात.
[संपादन] विश्वविद्यालय
इ.स. १९९५ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विश्वविद्यालयाची स्थापना झाली आणि सध्या १७२ महाविद्यालये या विश्वविद्यालयाला जोडली आहेत.
[संपादन] उच्च माध्यमिक परिक्षा विभाग
[संपादन] शैक्षणिक संस्था
[संपादन] उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये
[संपादन] अभियांत्रिकी महाविद्यालये
- श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
- महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय
[संपादन] वैद्यकीय महाविद्यालये
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
[संपादन] कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा महाविद्यालये
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज
- शारद भुवन शैक्षणिक संस्थेचे यशवंत महाविद्यालय
- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
- वसंतराव नाईक महाविद्यालय
[संपादन] माध्यमिक शिक्षण संस्था
- युनीर्वसल माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम)
- प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम)
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स हायस्कूल (मराठी माध्यम)
- गुजराती माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम)
- शारद भुवन शैक्षणिक संस्थेचे शारद भुवन माध्यमिक विद्यालय, नांदेड (मराठी माध्यम)
- शिवाजी माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम)
- भारत माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम)
- महात्मा फुले माध्यमिक विद्यालय
- ज्ञानमाता माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम)
- राजर्षि शाहू माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम)
[संपादन] राजकीय स्थान
नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. स्व. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकिय स्तरावर माहित असलेले महत्वपूर्ण व्यक्ति होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादि पदे भूषविली.
[संपादन] मतदारसंघ
- नांदेड मतदारसंघ
[संपादन] शासकीय स्थान
[संपादन] हे सुद्धा पहा
- ऐतिहासिक हैदराबाद मुक्तीसंग्रामचा आढावा.