विकिपीडिआ:आवाहन
From Wikipedia
[संपादन] एक आवाहन
मराठी विकिपीडिया अद्याप बाल्यावस्थेत आहे. इंटरनेटच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेल्या माहिती व ज्ञानाच्या आवाक्याशी ह्याची साईटची तुलना करणेदेखील हास्यास्पद ठरेल. परंतु, इंटरनेटद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती व ज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये खचितच ही साईट महत्वाची भूमिका पार पाडीत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने ह्या प्रयत्नांत विविध क्षेत्रांतील जाणकार मंडळीच्या मदतीची नितांत गरज आहे. आपण ह्या कार्यात काही मदत करू शकाल अशी आम्ही आशा करतो.
आपण मुख्यत्वे पुढील प्रकारे मदत करू शकता:
१. नवीन माहिती, ज्ञानाची भर - कोणत्याही ज्ञानकोषाचे उद्दिष्ट असते माहिती व ज्ञान पुरवणे. अर्थातच हे ज्ञान कोणी जाणकार, तज्ञ व्यक्तिंनी द्यावे लागते. आपणदेखील आपल्या क्षेत्रातील ज्ञान ह्या साईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
२. भाषांतर - इंग्लिश तसेच इतर भाषांमधील विविध क्षेत्रांसंबंधी माहिती तुम्ही मराठीमध्ये भाषांतरीत करून येथे भर घालू शकता.
३. माहिती तपासणे व चुका दुरुस्त करणे इतर लेखकांनी मांडलेली माहिती तपासणे आणि गरज वाटल्यास त्यातील चुका दुरुस्त करणे.