देवनागरी
From Wikipedia
लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन
[संपादन] देवनागरी ओळख
देवनागरी लिपी बऱयाच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती म्हणुन वापरली जाते आहे. जसे की संस्कृत, पाली, हिन्दी, मराठी, कोकणी, सिन्धी, काश्मीरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमा इत्यादी लिहिल्या जातात. देवनागरी बऱ्याच इतर भाषांप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. प्रत्येक शब्दाच्या वर एक रेषा ओढली जाते. हिचा विकास ब्राम्ही लिपीपासून झाला. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे जी इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चीनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जसाच्या तसा लिहिता येतो आणि लिहिलेल्या शब्दाचे हुबेहुब उच्चारण करता येऊ शकते, जे इंग्रजी किंवा इतर लिप्यांमध्ये शक्य नाही.
यात एकुण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १४ स्वर आणि ३८ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
भारत तसेच अशिया मधील अनेक लिप्यांचे संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. ( उर्दू सोडून) पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादि देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
[संपादन] देवनागरी लिपी वैशिष्ट्ये
- डावी कडून उजवी कडे
- बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण/ अक्षर चिन्हे /जोडाक्षरे
- ध्वनी
[संपादन] हे सुद्धा पहा
Categories: भाषा | लिपी