मार्च ८
From Wikipedia
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ५ | |||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | |||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६६ वा किंवा लीप वर्षात ६७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सतरावे शतक
- १६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
[संपादन] अठरावे शतक
- १७०२ - ऍन स्टुआर्ट ईंग्लंडच्या राणीपदी.
- १७८२ - ग्नाडेहुटेनची कत्तल - ओहायोत ग्नाडेहुटेन येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन व्यक्तिंचे डोके फोडून हत्या केली.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९०६ - अमेरिकेच्या सैन्याने फिलिपाईन्समध्ये लपुन बसलेल्या ६०० व्यक्तिंची कत्तल केली.
- १९११ - आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
- १९२१ - माद्रिदमध्ये स्पेनच्या पंतप्रधान एदुआर्दो दातोची संसदेबाहेर हत्या.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जावामध्ये नेदरलँड्सच्या सैन्याने जपान समोर शरणागति पत्करली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.
- १९४८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्रातील फलटण हे सस्थान भारतिय गणराज्यात सामिल झाले.
- १९५० - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
- १९५२ - आँत्वान पिनॉय फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६५ - सुमारे ३,५०० अमेरिकन मरीन दक्षिण व्हियेतनाममध्ये दाखल.
- १९८५ - बैरुतमध्ये एका मशिदीसमोर बॉम्बस्फोट. ८५ ठार, १७५ जखमी.
- १९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १५१४ - आमागो हारुहिसा, जपानी सामुराइ.
- १५४५ - यी सुन सिन, कोरियन दर्यासारंग.
- १७२६ - रिचर्ड होव, ईंग्लिश दर्यासारंग.
- १८४१ - ऑलिव्हर वेन्डेल होम्स, अमेरिकन न्यायाधीश.
- १९३७ - जुवेनाल हब्यारिमाना, ऱ्वान्डाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यु
- ११४४ - पोप सेलेस्टीन दुसरा.
- १२०२ - स्वेर, नॉर्वेचा राजा.
- १७०२ - विल्यम तिसरा, ईंग्लंडचा राजा.
- १८४४ - चार्ल्स चौदावा, स्वीडनचा राजा.
- १८७४ - मिलार्ड फिलमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३० - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
- १९९९ - ज्यो डिमाजियो, अमेरिकन बेसबॉलपटू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- आंतरराष्ट्रीय महिला दिन.
- मातृ दिन - अल्बेनिया.
- धुम्रपान निषिद्ध दिन - युनायटेड किंग्डम.
मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - (मार्च महिना)