जून २३
From Wikipedia
मे – जून – जुलै | |||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि | |
१ | २ | ३ | ४ | ||||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | |||
ई.स. २००६ ग्रेगरी दिनदर्शिका |
जून २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७४ वा किंवा लीप वर्षात १७५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
- १५३२ - हेन्री आठवा व फ्रांस्वा पहिल्याने चार्ल्स पाचव्याविरुद्ध गुप्त कट रचला.
[संपादन] सतरावे शतक
- १६८३ - पेनसिल्व्हेनियात विल्यम पेनने स्थानिक लेनी लेनापे जमातीशी मैत्री करार केला.
[संपादन] अठरावे शतक
- १७५७ - प्लासीची लढाई - रॉबर्ट क्लाईव्हच्या ३,००० ईस्ट ईंडिया कंपनीच्या सैनिकांनी सिराज उद दौलाच्या ५०,००० बंगाली सैनिकांना हरवले. ईस्ट ईंडिया कंपनीच्या भारतावरील वर्चस्वाची ही मुहुर्तमेढ होती.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - ओक्लाहोमातील फोर्ट टौसन येथे दक्षिणेच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली.
- १८९४ - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
[संपादन] विसावे शतक
- १९१९ - एस्टोनियन मुक्ती युद्ध - जर्मन सैन्याची हार. एस्टोनियात हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो.
- १९४० - दुसरे महायुद्ध - एडॉल्फ हिटलरने पराभूत पॅरिसला भेट दिली.
- १९५६ - गमाल अब्दुल नासर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९५९ - नॉर्वेतील स्टालहाइम शहरात हॉटेलला आग. ३४ ठार.
- १९६८ - आर्जेन्टीनाची राजधानी बोयनोस एर्समध्ये फुटबॉल सामन्या दरम्यान चेंगराचेंगरी. ७४ ठार.
- १९७९ - दुसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने ईंग्लंडला ९२ धावांनी हरवले.
- १९८५ - दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिश्क या बोईंग ७४७ प्रकारच्या विमानात स्फोट. ३२९ ठार.
- १९९० - मोल्दाव्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ई.स.पू. ४७ - फेरो टॉलेमी पंधरावा.
- १७६३ - जोसेफिन, फ्रांसची सम्राज्ञी.
- १८९४ - एडवर्ड आठवा, ईंग्लंडचा राजा.
- १९१० - गॉर्डन बी. हिंकली, मोर्मोन चर्चचा अध्यक्ष.
- १९१२ - ऍलन ट्युरिंग, ईंग्लिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९१६ - लेन हटन, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९३६ - कॉस्टास सिमिटिस, ग्रीक पंतप्रधान.
- १९३७ - मार्टी अह्तीसारी, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - व्हिंट सर्फ, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व इंटरनेटच्या जनकांपैकी एक.
- १९५७ - डेव्हिड हॉटन, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू.
- १९८० - रामनरेश सरवण, वेस्ट ईंडीझचा क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- ७९ - व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
- १०१८ - हेन्री पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १५१६ - फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
- १८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, संस्थापक-भारतीय जनसंघ; शिक्षणतज्ञ.
- १९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारतीय भूसेना प्रमुख.
- १९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.
- १९९६ - आंद्रियास पापेन्द्रु, ग्रीक पंतप्रधान.